मंत्रिमंडळ
आरोग्यसेवा पायाभूत विकासाला प्रोत्साहन
तीन नवीन एम्सच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
जम्मूमधील विजयनगर, सांबा , काश्मीरमधील अवंतिपुर, पुलवामा आणि गुजरातमधील राजकोट इथे नवीन एम्स स्थापन केली जाणार
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2019 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील मंजुरी दिली-
(ए) (I) विजय नगर, सांबा, जम्मू येथे 1661 कोटी रुपये खर्चून एम्सची स्थापना
(ii)अवंतीपुरा, पुलवामा,कश्मीर येथे 1828 कोटी रुपये खर्चून एम्सची स्थापना
(iii) गुजरातमधील राजकोट येथे 1195 कोटी रुपये खर्चून एम्सची स्थापना केली जाणार आहे. तिन्ही एम्स प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (पीएमएसएसवाय ) अंतर्गत स्थापन केले जाणार आहेत.
(बी) तिन्ही एम्स साठी प्रत्येकी एका संचालकपदाची निर्मिती, 2,25,000 रुपये (निर्धारित) मूळ वेतन + एनपीए (वेतन +एनपीए 2,37,500 रुपयांपेक्षा अधिक असणार नाहीत)
|
अनुक्रमांक
|
नवीन एम्स
|
बांधकामासाठी मुदत आणि विवरण
|
|
1.
|
विजय नगर, सांबा, जम्मू
|
48 महिने- 12 महिन्यांचा बांधकामपूर्व टप्पा, 30 महिन्यांचा बांधकाम टप्पा आणि 6 महिन्यांचा स्थिर/ चालू होण्याचा टप्पा
|
|
2.
|
अवंतीपुरा, पुलवामा, कश्मीर
|
72 महिने- 12 महिन्यांचा बांधकामपूर्व टप्पा, 54 महिन्यांचा बांधकाम टप्पा आणि 6 महिन्यांचा स्थिर/ चालू होण्याचा टप्पा
|
|
3.
|
राजकोट,गुजरात
|
45 महिने- 10 महिन्यांचा बांधकामपूर्व टप्पा, 32 महिन्यांचा बांधकाम टप्पा आणि 3 महिन्यांचा स्थिर/ चालू होण्याचा टप्पा
|
विवरण:-
(ए) नवीन एम्सच्या स्थापनेत रुग्णालय, वैद्यकीय आणि परिचारिका अभ्यासक्रमांसाठी शिक्षण विभाग, निवासी परिसर आणि एम्स नवी दिल्ली तसेच पीएमएसएसवायच्या पहिल्या टप्प्यांतर्गत सुरु करण्यात आलेल्या 6 नवीन एम्सच्या धर्तीवर सुविधा/सेवांची निर्मिती समाविष्ट आहे. परिसरात गुणवत्ता संपन्न उच्च दर्जाची आरोग्य सेवा , वैद्यकीय शिक्षण , नर्सिंग शिक्षण आणि संशोधनासाठी राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून एम्स स्थापन करणे हा यामागील उद्देश आहे.
(बी)(i) प्रत्येक नवीन एम्समध्ये 100 पदवी (एमबीबीएस) जागा आणि 60 बीएससी(नर्सिंग) जागा असतील.
(ii) प्रत्येक एम्समध्ये 15-20 अतिविशिष्ट विभाग असतील.
(iii) प्रत्येक एम्समध्ये 750 खाटा असतील यात आपत्कालीन, ट्राऊमा खाटा, आयुष खाटा, खासगी खाटा, आणि आयसीयू विशिष्ट आणि अतिविशिष्ट खाटांचा समावेश असेल.
(iv) प्रत्येक एम्समध्ये दररोज सुमारे 1500 ओपीडी रुग्ण आणि वॉर्डांमध्ये दर महिन्याला 1000 रुग्णांची तपासणी केली जाईल.
(v) प्रत्येक एम्समध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय, एक आयुष ब्लॉक, प्रेक्षागृह, रात्र निवारा, अतिथि गृह, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि निवासी सुविधा असतील.
खर्च:-
नवीन एम्सच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करेल. नवीन एम्सच्या परिचालन आणि देखभालीचा खर्च पूर्णपणे केंद्र सरकार करेल.
नवीन एम्सच्या स्थापनेमुळे भांडवली मालमत्ता निर्माण होईल आणि यासाठी आवश्यक तज्ञ मनुष्यबळाची निर्मिती 6 नवीन एम्सच्या धर्तीवर होईल.
प्रभाव :-
नवीन एम्सच्या स्थापनेमुळे आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षणात परिवर्तन होईल आणि या भागातील आरोग्य व्यावसायिकांची कमतरता दूर होईल.
नवीन एम्सच्या स्थापनेमुळे जनतेला अतिविशिष्ट आरोग्य सेवा पुरवण्याचा दुहेरी उद्देश पूर्ण होईल.
यामुळे या भागात डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कुमक निर्माण होईल जी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील संस्था /सुविधासाठी उपलब्ध असतील.
रोजगार निर्मिती:-
जम्मू आणि काश्मीर तसेच गुजरात येथे नवीन एम्सच्या स्थापनेमुळे प्रत्येक एम्समध्ये विविध शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची रोजगार निर्मिती होईल.
नवीन एम्सच्या आसपास शॉपिंग सेंटर, कैंटीन यांसारख्या सुविधांमुळे अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.
नवीन एम्सच्या पायाभूत विकासातील बांधकामाच्या विविध टप्प्यात लक्षणीय रोजगार निर्मिती होईल.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1559582)
आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English