मंत्रिमंडळ

स्वाझीलंडला कर संबंधी सहाय्य पुरवण्यासाठी संदर्भ अटींवर स्वाक्षरी करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 10 JAN 2019 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि स्वाझीलंड (आता इस्‍वातिनीम्हणून प्रचलित) यांच्यात सीमा रहित कर निरीक्षक कार्यक्रमअंतर्गत स्वाझीलंडला कर संबंधी सहाय्य देण्यासाठी निर्देशित भारतीय तज्ञांच्या सहभागाने संदर्भ अटींवर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

तपशीलवार मुद्दे:-

सीमा रहित कर निरीक्षक (टीआयडब्‍ल्‍यूबी) कार्यक्रमअंतर्गत भारत सरकार आणि ईस्‍वातिनी सरकारने एका भारतीय तज्ञाची परस्परांशी चर्चा करून निवड केली आहे.

संदर्भ अटींमुळे टीआयडब्‍ल्‍यूबी कार्यक्रमांतर्गत  इस्‍वातिनीला कर संबंधी सहाय्य देण्यासाठी नियुक्त भारतीय तज्ञांच्या सहभागाशी संबंधित अटींना औपचारिक स्वरूप दिले जाईल.

            प्रमुख परिणाम:-

टीआयडब्‍ल्‍यूबी कार्यक्रमांतर्गत भारतीय तज्ञांच्या सहभागामुळे विकसनशील देशांमध्ये  कर संबंधी प्रकरणांमध्ये क्षमता निर्मिती करण्यात भारताकडून दिल्या जाणाऱ्या मदतीला चालना मिळेल.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 (Release ID: 1559578) Visitor Counter : 150


Read this release in: English