गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्र्यांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019, लोकसभेत सादर
Posted On:
08 JAN 2019 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2019
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019, लोकसभेत सादर केले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे.
हे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतचं मर्यादित नाही. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू राहील असे राजनाथ सिंह यांनी हे विधेयक सादर करताना स्पष्ट केले. या विधेयकाअंतर्गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1559177)