मंत्रिमंडळ

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणून फेररचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2019 7:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019

 

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी सध्याच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेची राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणून फेररचना करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

यानुसार सध्याची राष्ट्रीय आरोग्य संस्था विसर्जित होऊन त्याची जागा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण घेईल. हे प्राधिकरण आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संलग्न राहील. यासाठी नवा निधी मंजूर करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य संस्थेसाठी याआधी मंजूर केलेला निधी या प्रस्तावित प्राधिकरणासाठी उपयोगात आणला जाईल.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1558272) आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English