गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सीएलएसएसला 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2018 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2018
मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सीएलएसएस अर्थात कर्जाशी संलग्न अनुदान योजनेला गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाने आणखी 12 महिन्यांची म्हणजे 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप पुरी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सीएलएसएसची कामगिरी अत्यंत उत्तम राहिली असून या वर्षअखेरपर्यंत लाभार्थ्यांची संख्या सुमारे एक लाखांपर्यंत जाऊ शकते, असे पुरी यांनी सांगितले.
आतापर्यंत मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांची संख्या 93,007 असून 1,960.45 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
B.Gokhale/S.Kakde/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1557939)
आगंतुक पटल : 70
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English