मंत्रिमंडळ

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला चालना


भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठवण्याच्या उपक्रमाला (गगनयान उपक्रमाला) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
दोन मानवरहित याने सोडण्याचे नियोजन
अंतराळवीर घेऊन जाणारे पहिले यान 40 महिन्यात
पहिल्या टप्प्यातल्या मोहिमेसाठी खर्च 9023 कोटी रुपये

Posted On: 28 DEC 2018 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गगनयान उपक्रमाला मंजुरी देण्यात आली. पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत अंतराळवीर घेऊन जाणारे अंतराळयान सोडण्यात येईल. त्याचा कालावधी एक कक्षीय कालावधी ते किमान सात दिवस असेल. तीन सदस्यांसाठी आवश्यक तरतुदी असलेले जीएसएलव्ही एमके-111 यासाठी वापरले जाईल. गगनयान उपक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय संस्था, प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग यांच्याशी इस्रो समन्वय साधेल.

खर्च:-

गगनयान उपक्रमासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यात तंत्रज्ञान विकास, उड्डाणासाठीचे हार्डवेअर आणि आवश्यक पायाभूत घटकांच्या खर्चाचा समावेश आहे. गगनयान उपक्रमात दोन मानवविरहित आणि एक मानवसहित यानाचा समावेश आहे.

फायदे:-

वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षमता यांना यामुळे चालना मिळणार आहे. संशोधन आणि तंत्रज्ञान विकास यात व्यापक सहभागामुळे विद्यार्थी आणि संशोधकांना मोठा फायदा मिळणार आहे. या उपक्रमामुळे प्रगत तंत्रज्ञानामध्ये रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानात करिअर करण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. उड्डाण यंत्रणेची पूर्तता उद्योगामार्फत होईल.

अंमलबजावणी धोरण आणि लक्ष्ये:-

उद्योगामार्फत उड्डाण हार्डवेअर पूर्ततेसाठी इस्रोवर जबाबदारी असेल. गगनयान उपक्रम राष्ट्रीय प्रयत्न आहे. सदस्यांचे प्रशिक्षण, मानव जीव विज्ञान, तंत्रज्ञान विकास तसेच आरेखन अवलोकनात राष्ट्रीय संस्था, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्था यात सहभाग होतील. अंतराळवीर घेऊन जाणाऱ्या पहिल्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक मंजुरीपासून 40 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उदिृष्ट ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी पूर्ण तयारीनिशी दोन मानवरहित याने सोडण्यात येतील.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 


(Release ID: 1557658) Visitor Counter : 239


Read this release in: English