मंत्रिमंडळ
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत तामिळनाडू आणि तेलंगण येथे दोन नवीन एम्स स्थापन करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
17 DEC 2018 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, आज प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत, तामिळनाडूतील मदुराई, येथे 1,264 कोटी रुपये आणि तेलंगणमधील बीबीनगर येथे 1,028 कोटी रुपये खर्चून दोन नवीन अखिल भारतीय वैद्यकीय संस्था अर्थात एम्स स्थापन करायला मंजुरी दिली.
केन्द्रीय मंत्रिमंडळाने वरील दोन्ही एम्स मध्ये ,25,000 रूपये (निर्धारित) + एनपीए ( वेतन + एनपीए 2,37,500 रुपयांपेक्षा अधिक नाही ) या मूळ वेतनात संचालकांचे एक पद निर्माण करायला देखील मंजुरी दिली आहे.
लाभ :
प्रत्येक नवीन एम्स मध्ये पदवीच्या (एमबीबीएस) १०० जागा आणि बीएससी (नर्सिंग) च्या 60 जागा असतील.
प्रत्येक नवीन एम्स मध्ये 15-20 सुपर स्पेशियलिटी विभाग असतील.
प्रत्येक नवीन एम्समध्ये सुमारे 750 खाटा असतील.
सध्याच्या एम्सच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक नवीन एम्समध्ये प्रतिदिन 1500 बाह्य रुग्ण तर 1000 अंतर्गत रुग्ण येतील अशी शक्यता आहे.
प्रकल्प विवरण :
नवीन एम्सच्या स्थापनेत रुग्णालय निर्मिती, वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी शिक्षण विभाग, तयार करणे , निवासी संकुल उभारणे तसेच 6 नवीन एम्सच्या धर्तीवर संबंधित सुविधा / सेवा प्रदान करणे यांचा समावेश आहे. प्रस्तावित संस्थेत 750 खाटा क्षमतेचे रुग्णलाय असेल, ज्यात आपतकालीन/ ट्राऊमा , आयुष , खासगी आणि आईसीयू स्पेशियलिटी आणि सुपरस्पेशियलिटी खाटा असतील. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालय , आयुष ब्लॉक, ऑडिटोरियम, रात्र निवारा, अतिथि गृह, वसतिगृहे आणि निवासी सुविधा असतील.
प्रभाव :
नवीन एम्सच्या स्थापनेमुळे केवळ शिक्षण आणि प्रशिक्षणात परिवर्तन येणार नाही तर देशातील आरोग्य सेवेतील व्यावसायिकांची कमतरता दूर होईल.
रोजगार निर्मिती :
या राज्यांमध्ये नवीन एम्सच्या स्थापनेमुळे प्रत्येक एम्समध्ये विविध फॅकल्टी आणि बिगर फॅकल्टी पदांवर सुमारे 3000 लोकांना रोजगार मिळेल. शॉपिंग सेंटर, कैंटीन सारख्या सुविधा आणि सेवांमुळे नवीन एम्सच्या आसपासच्या परिसरात अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील.
B.Gokhale/ S. Kane/ P.Malandkar
(Release ID: 1556361)
Visitor Counter : 122