कृषी मंत्रालय
थेट लाभ हस्तांतरणाशी जोडण्यासाठी ‘एन्शुअर’ ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2018 5:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2018

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांनी ENSURE राष्ट्रीय पशुधन मोहीम- EDEG हे पोर्टल सुरु केले. नाबार्डने हे पोर्टल विकसित केले आहे. या मोहिमेतील ईडीईजी अंतर्गत, अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच हे सुलभ करण्यासाठी नाबार्डने ‘ENSURE’ हे पोर्टल विकसित केले आहे.
या नवीन प्रक्रियेत कर्ज मंजूर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांत अनुदान मंजूर केले जाईल असे सिंग म्हणाले.
N.Sapre/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1555532)
आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English