अर्थ मंत्रालय

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचा सोने तस्करीवर घाला सुरुच, 21 कोटी रुपयांचे 66 किलो सोने जप्त

Posted On: 10 DEC 2018 3:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2018

 

अर्थ मंत्रालयाच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने संघटित सोने तस्करीविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत 6 आणि 7 डिसेंबर 2018 रोजी अंदाजे 21 कोटी रुपये किंमतीचे 66 किलो सोने जप्त करण्यात आले. लखनौ, कोलकाता आणि सिलीगुडी येथील दोन ठिकाणांहून हे सोने जप्त करण्यात आले. तर चौघांना अटक करण्यात आली आणि चार गाड्या ताब्यात घेण्यात आल्या.

सोने तस्करी करणारी टोळी पश्चिम बंगालमधल्या भारत-भूतान सीमेवरुन परदेशातील सोन्याचा मोठा साठा भारतातील विविध भागात पाठवत असल्याची माहिती गुप्तहेर संचालनालयाला मिळाली होती.

एप्रिल ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत सीमाशुल्क विभागाने 2.63 टन सोने जप्त केले आहे.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor


(Release ID: 1555385)
Read this release in: English