मंत्रिमंडळ

भारत आणि रशिया दरम्यान मानव अंतराळ उड्डाण  कार्यक्रमाअंतर्गत, संयुक्त उपक्रमांवरील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2018 10:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली  केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि रशिया दरम्यान मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रमाअंतर्गत, संयुक्त उपक्रमांवरील सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. नवी

दिल्लीत १५ ऑक्टोबर २०१५ रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

प्रमुख प्रभाव :

या करारामुळे भारत आणि रशिया दरम्यान सहकार्य  मजबूत होईल आणि रेडियेशन शिल्डिंग, लाइफ स्पोर्ट सिस्टम, क्रू मॉड्यूल, बैठकीचे  स्थळ  आणि  डॉकिंग प्रणाली, अंतराळ  कक्ष, अंतराळ प्रवाशांसाठी प्रशिक्षण या सारख्या  मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी तंत्रज्ञान आणि प्रगत प्रणाली विकसित करायला चालना मिळेल.

लाभ :

या करारामुळे मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञान वापर क्षेत्रात संयुक्त उपक्रमांमध्ये वाढ होईल.  एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल, जो करारातील तरतुदी लागू कारण्याबाबत कालावधी आणि उपाय योजनांसह कृती योजना तयार करेल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1555116) आगंतुक पटल : 104
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English