आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
ग्रामीण विद्युतीकरण महामंडळातील केंद्र सरकारच्या एकूण ५२.६३ % समभागांची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणासह धोरणात्मक विक्री करायला मंत्रिमंडळाची तत्त्वतः मंजुरी
Posted On:
06 DEC 2018 9:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय समितीने, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळातील (आरईसी) केंद्र सरकारच्या एकूण ५२.६३ % समभागांची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला (पीएफसी ) व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणासह धोरणात्मक विक्री करायला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
या अधिग्रहणाचा उद्देश संपूर्ण ऊर्जा साखळीचे एकात्मीकरण , उत्तम समन्वय, अर्थव्यवस्थेची व्याप्ती वाढवणे, आणि ऊर्जा क्षेत्राला अर्थपुरवठा करण्याच्या सुधारित क्षमतेद्वारे ऊर्जा प्रवेश आणि उर्जेची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. संयुक्त युनिटसाठी सौदा क्षमतेच्या वाढीसह स्वस्त निधी उभारण्याची देखील परवानगी मिळू शकेल.
आरईसी आणि पीएफसी हे दोन्ही ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहेत.
****
B.Gokhale/ S. Kane
(Release ID: 1555035)
अभ्यागत कक्ष : 113