श्रम आणि रोजगार मंत्रालय

ईएसआयसी, विमा न काढलेल्या व्यक्तींसाठीही वैद्यकीय सुविधांचा लाभ देणार

Posted On: 06 DEC 2018 5:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2018

 

केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या काल झालेल्या 176 व्या बैठकीत महामंडळाच्या वैद्यकीय सुविधा प्रदान करणाऱ्या यंत्रणेत अधिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

विमा न काढलेल्या व्यक्तींना ईएसआयसीच्या कमी उपयोगात असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बाह्यरुग्ण विभागाकरिता 10 रुपये हा अनुदानित दर, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसाठी सीजीएचएस पॅकेजच्या 25 टक्के रक्कम द्यावी लागेल. या निर्णयामुळे सामान्य जनतेला अल्प दरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर रुग्णालय संसाधनांचा जनतेसाठी पूर्णत: उपयोग होईल.

सामाजिक सुरक्षा अधिकारी, विमा चिकित्सा अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अभियंता यांसारख्या विविध श्रेणीतली 5200 पदांसाठीच्या भर्ती संदर्भातली प्रक्रिया सुरू आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1554885) Visitor Counter : 110


Read this release in: English