सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्राची आदरांजली

Posted On: 06 DEC 2018 3:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2018

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्र त्यांना आज आदरांजली अर्पण करत आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज सकाळी संसद भवन कॉम्प्लेक्समधल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉ. थावरचंद गेहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कृष्णन पाल गुर्जर, विजय सांपला यांच्यासह इतर मान्यवरांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या आंबेडकर फाऊंडेशन या स्वायत्त संघटनेने कार्यक्रम आयोजित केला होता.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1554859) Visitor Counter : 95


Read this release in: English