अर्थ मंत्रालय

भारत आणि पेरू यांच्यात सीमा शुल्क विषयक प्रकरणात सहकार्य आणि परस्परांना मदत करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 05 DEC 2018 5:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2018

 

सीमा शुल्क विषयक प्रकरणात सहकार्य आणि परस्परांना मदत करण्यासाठीच्या करारावर आज भारत आणि पेरू यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मुंबईत तीन तारखेपासून सुरू असलेल्या वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेश्नच्या धोरण आयोगाच्या 80व्या बैठकीदरम्यान उभय देशांनी या स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे दोन्ही देशातल्या कस्टम्स अधिकाऱ्यांना सीमाशुल्कविषयक कायद्याची योग्य अंमलबजावणी, सीमा शुल्क गुन्ह्यांचा तपास यासंदर्भात माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी कायदेशीर चौकट प्राप्त होणार आहे. या करारामुळे व्यापारासाठी सुलभता अपेक्षित आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1554788) Visitor Counter : 87


Read this release in: English