अंतराळ विभाग

भारताच्या अत्याधुनिक दूरसंवाद उपग्रह जीसॅट-11चे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण

प्रविष्टि तिथि: 05 DEC 2018 1:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2018

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या सर्वात अवजड आणि अती प्रगत जीसॅट-11 या दूरसंवाद उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण झाले. एरियन 5 VA-246 या प्रक्षेपक यानानं भारताचा जीसॅट-11 आणि दक्षिण कोरियाचा GEO-KOMPSAT-2A या उपग्रहांना घेऊन उड्डाण केले. 30मिनिटानंतर जीसॅट-11, एरियन 5 पासून यशस्वीरित्या अलग झाला.

5854 किलो वजनाच्या जीसॅट-11 या उपग्रहामुळे भारतात हाय डाटारेट कनेक्टिविटी प्राप्त होणार आहे. या उपग्रहामुळे ग्रामीण भागात तसेच डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या भारत नेट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या दुर्गम ग्रामपंचायतींसाठी ब्रॉडबॅण्ड कनेक्टिविटीला चालना मिळणार आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी दिली. आजच्या यशस्वी उड्डाणामुळे संपूर्ण चमूचा आत्मविश्वास वाढल्याचे ते म्हणाले. भारत नेट कार्यक्रमाअंतर्गत ई-बँकिंग, ई-आरोग्य, ई-प्रशासन यासारख्या लोकसेवा योजनांचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1554730) आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English