मंत्रिमंडळ

दादरा-नगर हवेलीमधल्या सिल्वासा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2018 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22  नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दादरा-नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात सिल्वासा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

ठळक वैशिष्ट्ये:-

  1. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 189 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 114 कोटी रुपये 2019-20 या वर्षात तर 75 कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर वेळोवेळी दिले जातील.
  2. 2019-20 पर्यंत या महाविद्यालयाची इमारत बांधून पूर्ण होईल आणि भारतीय वैद्यकीय परिषदेकडून त्यासाठी निधी मिळेल.
  3. वैद्यकीय महाविद्यालयाचा वार्षिक खर्च केंद्रशासित प्रदेशाकडून केला जाईल.
  4. या विद्यापीठासाठी 14 स्तरावरची 21 नियमित पदे आणि त्याशिवाय 357 पदांची शिफारस करण्यात आली आहे.

या महाविद्यालयांमुळे डॉक्टरांची संख्या वाढेल तसेच केंद्रशासित प्रदेशातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1553547) आगंतुक पटल : 105
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English