मंत्रिमंडळ

युवा व्यवहारासंबंधित विषयांवर भारत आणि तझाकिस्तान यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंदीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2018 4:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22  नोव्हेंबर 2018

 

युवकांशी संबंधित व्यवहारात सहकार्य  वृद्धिंगत करण्याविषयी भारत आणि तझाकिस्तान यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 8 ऑक्टोबर 2018 रोजी हा दुशआंबे येथे हा करार करण्यात आला होता.

हा करार पाच वर्षे अस्तित्वात राहणार आहे. या अंतर्गत, युवकांच्या संघटनाचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांच्यात देवाणघेवाण होऊन, युवकांविषयी धोरण निर्मिती केली जाणार आहे. त्याशिवाय युवकांच्या प्रश्नावर आंतराराष्ट्रीय चर्चासत्रे, सेमिनार आयोजित केली जातील त्याशिवाय विविध लेख, चित्रपट, संशोधन प्रबंध, अनुभव यांच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल. युवकांची शिबिरे, महोत्सव आयोजित केले जातील.

या सामंजस्य कराराचा उद्देश भारत आणि तझाकिस्तान यांच्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करुन युवकांशी संबंधित व्यवहार आणि विषयांमध्ये परस्पर संबंध दृढ करणे. आणि माहितीचे आदानप्रदान करणे हा आहे.

लाभ:

या करारामुळे, युवक व्यवहारविषयातील कल्पना, मूल्ये आणि सांस्कृतिक बंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar


(रिलीज़ आईडी: 1553514) आगंतुक पटल : 108
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English