मंत्रिमंडळ
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारताच्या “अटल संशोधन अभियान”, आणि रशियाच्या “गुणवत्ता आणि यश अभियान”, यांच्यातील सामंजस्य कराराविषयी केंद्रीय मंत्रिमंडळाला देण्यात आलेली माहिती
Posted On:
22 NOV 2018 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2018
देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भारतातील “अटल संशोधन अभियान” आणि रशियातील “गुणवत्ता आणि यश अभियान” यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराविषयी केंद्रीय मंत्रिमंडळाला आजच्या बैठकीत माहिती देण्यात आली. या करारामुळे, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांच्यात देवाणघेवाण होऊन दोन्ही देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया मजबूत होईल. 5 ऑक्टोबर 2018 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
लाभ:
या करारामुळे, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांच्यात देवाणघेवाण होऊन भारत आणि रशिया या दोन्ही देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया मजबूत होईल.
परिणाम:
या सामंजस्य करारामुळे, दोन्ही देशातील शाळा, विद्यापीठे, सांस्कृतिक संस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था,उच्छाह उच्च तंत्रज्ञान संस्था, स्टार्ट अप आणि संशोधन केंद्रे यांच्यात परस्पर सहभाग वाढेल. यामुळे दोन्ही देशात वैज्ञानिक अभ्यास, बौद्धिक संपदा निर्मिती, संशोधन याला चालना मिळेल.
पार्श्वभूमी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23-24 डिसेंबरला रशिया दौऱ्यावर गेले असतांना, त्यांनी ही संकल्पना मांडली होती.रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या भारत भेटी दरम्यान त्या संकल्पनेला आकार देण्यात आला. त्या चर्चेनुसार हा करार करण्यात आला आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1553494)
Visitor Counter : 156