मंत्रिमंडळ

आंध्र प्रदेशात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा,  2009 मध्ये दुरुस्ती करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 08 NOV 2018 11:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करायला मंजुरी दिली. आंध्र प्रदेश पुनर्संघटन कायदा 2014 (No. 6 of 2014).च्या १३ व्या सूचीअंतर्गत तरतुदीनुसार विजयनगरमच्या रेल्ली गावात ‘आंध्र प्रदेश केंद्रीय आदिवासी विदयापीठ’ स्थापन केले जाईल. केंद्रीय आदिवासी विदयापीठाच्या पहिल्या टप्प्यातील खर्चासाठी 420 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1552267) आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English