मंत्रिमंडळ

नागरी आणि व्यवसायिक प्रकरणांमधे कायदेशीर बाबींविषयक परस्पर सहकार्य करण्याबाबतच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 08 NOV 2018 11:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि मोरोक्को यांच्यादरम्यान झालेल्या कराराला मंजुरी देण्यात आली. दोन्ही देशांमधील नागरी आणि व्यावसायिक प्रकरणात परस्परांना कायदेशीर सहकार्य करण्याबाबतचा हा करार आहे.

 

ठळक वैशिष्ट्ये:

आरोपीला समन्स बजावणे, कायदेशीर कागदपत्रे किंवा प्रकिया, दिवाणी खटल्यांमधले पुरावे देणे, कागदपत्रांची पूर्तता, दिवाणी खटल्यांमध्ये पुरावे देण्यासाठी पत्र देणे

आणि

४) लवादाचे खटले निश्चित करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे

 

लाभ :

ह्या करारामुळे, दोन्ही देशातील नागरिकांना लाभ होणार आहेत. तसेच दोन्ही देशातील मैत्री अधिक बळकट होईल तसेच, दिवाणी आणि व्यावसायिक विषयांबाबत सहकार्य वाढवणे हा या कराराचा आत्मा आणि सार आहे. भारत आणि मोरोक्कोदरम्यानच्या या सहकार्य करारामुळे आरोपीला बोलावणे, कायदेशीर कागदपत्रे, कायदेशीर आदेशांचे पालन आणि लवादासमोरचे खटले शक्य होणार आहे.

 

पार्श्वभूमी :

भारत आणि आफ्रिकन देशातील संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत. भारत आणि मोरोक्को दरम्यानचे द्विपक्षीय संबंधही मैत्रीपूर्ण आहेत. दोन्ही देशांमधील दिवाणी आणि व्यावसायिक कायदेशीर सहकार्य अधिक वाढवण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1552266) Visitor Counter : 79


Read this release in: English