मंत्रिमंडळ

भारत आणि मोरोक्कोदरम्यानच्या प्रत्यर्पण करारावर स्वाक्षरी करुन हा करार मूर्त स्वरूपात आणण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 08 NOV 2018 10:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि मोरोक्को दरम्यानच्या प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी करुन त्याला मूर्त स्वरूप देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मोरोक्कोच्या अतिशय महत्वाच्या व्यक्तींच्या 11-18 दरम्यान होणाऱ्या  भारत भेटीच्या वेळी ह्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे

 

लाभ:

या करारामुळे फरार गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्यासाठी भक्कम कायदेशीर आधार तयार होईल. यात वित्तीय गुन्हेगार, दहशतवादी आणि इअतर गंभीर गुन्हेगारांचा समावेश असेल. ह्या करारामुळे भारत आणि मोरोक्को या दोन्ही देशातील राष्ट्रीय हितसंबंधांना धोका पोचवणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यात मदत झाली आहे.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1552261) आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English