पंतप्रधान कार्यालय

दि. २ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान एम.एस.एम.इ क्षेत्रासाठी मोठया प्रमाणावर पाठिंबा आणि आउटरीच कार्यक्रमाचा शुभारंभ करणार

Posted On: 01 NOV 2018 9:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, ०२ नोव्हेंबर, २०१८  रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) केंद्र सरकारच्या सपोर्ट आणि आउटरीच प्राथमिकता कार्यक्रमाचा शुभारंभ  करतील.

दिल्ली व्यतिरिक्त, देशभरातील 100 ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील, जेथे केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री उपस्थित राहतील. हे सर्व स्थानके मुख्य कार्यक्रमासाठी दिल्लीशी जोडले जातील, ज्यात पंतप्रधानांचे  विशेष संबोधन राहील. एमएसएमई सेक्टरच्या विकासासंबंधी अनेक बाबींवर ते आपल्या भाषणातून प्रकाशझोत टाकतील असा अंदाज आहे.

अलिकडच्या वर्षांत केंद्र सरकारने एमएसएमई क्षेत्राला उच्च प्राधान्य दिले असून,  हा आउटरीच आणि पाठिंबा कार्यक्रम, संपूर्ण देशात  पुढील 100 दिवस चालेल, या क्षेत्रासाठी केलेल्या प्रयत्नांना आणखी सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. मिशन मोडमध्ये अंमलबजावणी करण्याच्या या कार्यक्रमाची प्रगती, केंद्रीय आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे सातत्याने केली जाईल.

केंद्रीय अर्थ व कॉरपोरेट व्यवहार  मंत्री  अरुण जेटली आणि केंद्रीय राज्यमंत्री (आय / सी) एमएसएमई,  गिरिराज सिंह, या वेळी उपस्थित असतील.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1551690) Visitor Counter : 122


Read this release in: English