अर्थ मंत्रालय

ऑक्टोबर 2018 मधील वस्तू आणि सेवा कर महसूल वसुलीने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

प्रविष्टि तिथि: 01 NOV 2018 3:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2018

 

ऑक्टोबर 2018 या महिन्यातल्या वस्तू आणि सेवा कर महसूल वसुलीने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.

ऑक्टोबर 2018 मध्ये वस्तू आणि सेवा कराद्वारे मिळालेल्या महसुलात केंद्रीय वस्तू सेवा कराचा वाटा 16 हजार 464 कोटी रुपये तसेच राज्य वस्तू सेवा कराचा वाटा 22 हजार 826 कोटी रुपये आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय वस्तू सेवा कराद्वारे मिळालेल्या 53 हजार 419 कोटींचा आणि 8 हजार कोटी रुपयांचा सेस (अधिभाराचा) समावेश आहे.

सप्टेंबर महिन्यासाठी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत 67.45 लाख रुपयांचा परतावा दाखल झाला होता.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1551540) आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English