मंत्रिमंडळ
ओदिशातल्या झारसुगुडा विमानतळाच्या नामांतराला मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2018 1:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओदिशातल्या झारसुगुडा विमानतळाच्या ‘वीर सुरेंद्र साई विमानतळ, झारसुगुडा’ या नामांतराला मान्यता देण्यात आली.
फायदे
वीर सुरेंद्र साई हे ओदिशातील विख्यात स्वातंत्र्य सैनिक आहेत. झारसुगुडा विमानतळाचे त्यांच्या नावावरुन नामांतर झाल्यामुळे संबंधित क्षेत्रातल्या स्थानिकांच्या भावनांचे प्रतिबिंब असणारी ओदिशा सरकारची बहुप्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे. तसेच राज्याशी संबंधित या महान व्यक्तिमत्वाला ही साजेशी आदरांजली ठरेल.
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1551497)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English