मंत्रिमंडळ
भारत-रशिया महासंघादरम्यान वाहतूक शिक्षण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला देण्यात आली माहिती
Posted On:
01 NOV 2018 1:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज रशियासोबत 5 ऑक्टोबर 2018 रोजी झालेल्या सामंजस्य करार आणि सहकार्य कराराबाबत माहिती देण्यात आली.
- वाहतूक मंत्रालय आणि रशिया महासंघादरम्यान वाहतूक शिक्षण क्षेत्रातील सहकार्य विकसित करण्याबाबत सामंजस्य करार
- रेल्वे क्षेत्रातल्या तांत्रिक सहकार्यासंदर्भात रशियन रेल्वे या संयुक्त समभाग कंपनीशी सहकार्य करार
या दोन्ही करारांमुळे रेल्वे क्षेत्रातील अत्याधुनिक विकास आणि माहिती वाटून घेण्यासाठी भारतीय रेल्वेला एक मंच उपलब्ध होईल.
या करारांमुळे तांत्रिक तज्ज्ञांची अहवाल आणि तंत्रज्ञानविषयक कागदपत्रांची देवाण-घेवाण, विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रशिक्षण आणि चर्चासत्र/कार्यशाळा तसंच माहिती वाटून घेण्यासाठी इतर देवाणघेवाण सोयीची होईल.
सहकार्य सामंजस्य करारामुळे तांत्रिक सहकार्यातील या क्षेत्रांना सहकार्याला चालना मिळेल.
अ) नागपूर-सिकंदराबाबद विभागात प्रवासी रेल्वे गाड्यांचा वेग प्रति तास 200 किलोमीटर (अर्ध वेगवान वेग) पर्यंत वाढवण्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी आणि भारतीय रेल्वे जाळ्याच्या इतर दिशांमधल्या विभागातला संभाव्य विस्तार
ब) प्रादेशिक स्तर, विभागीय रेल्वे आणि/किंवा भारतीय रेल्वेच्या प्रादेशिक विभागातील वाहतुकीच्या नियोजनासाठी एकल वाहतूक नियंत्रण केंद्राची अंमलबजावणी
क) सानुकुलता, संयुक्त निर्मिती संघटना आणि स्पर्धात्मक सिग्नलिंग आणि इंटर-लॉकिंग प्रणालीची अंमलबजावणी
ड) सेमी हाय स्पीड आणि त्यावरील प्रणालीसाठी टर्न आऊट स्विचेस स्थानिक पातळीवर पुरवठा
इ) रशियन रेल्वेशी संबंधित उच्च शिक्षण संस्थांच्या भागीदारीतून भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रगत योग्यतेत सुधारणा
ई) माल वाहतूक कार्यातील सर्वोत्तम सराव
उ) भारतात बहुआयामी/बहु आकाराच्या टर्मिनल्सचा संयुक्त विकास
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1551485)