मंत्रिमंडळ
देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर भारतीय कौशल्य संस्थांची स्थापना करण्यासाठी कॅबिनेटची मंजूरी
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2018 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मध्ये देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस) स्थापन करण्याची मंजूरी दिली आहे, ठिकाणांची निवड मागणी आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यातून करण्यात येईल.
फायदेः
आयआयएसच्या स्थापनेमुळे उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण, उपयोजित संशोधन-शिक्षण आणि उद्योगाशी प्रत्यक्ष आणि अर्थपूर्ण संबंध मिळाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता वाढीस लागेल. यामुळे देशभरातील तरुणांना अत्यंत कुशल प्रशिक्षण मिळवण्याची संधी मिळेल आणि उद्योग आणि जागतिक क्षेत्रातील स्पर्धात्मकतेशी जोडणीचा त्यांना फायदा मिळेल.
खाजगी क्षेत्राची उद्यमशीलता आणि जमिनीच्या रुपात सरकारी भागीदारी यांची सांगड घालून कौशल्य, नैपुण्य आणि स्पर्धात्मकता असलेल्या नवीन संस्था तयार होतील.
N.Sapre/M.Chopade/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1550531)
आगंतुक पटल : 102
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English