भूविज्ञान मंत्रालय
राणी झांसी उड्डाणपुलाचे दिल्लीत उद्घाटन
Posted On:
16 OCT 2018 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2018
केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते उत्तर दिल्लीतल्या बहुप्रतिक्षित राणी झांसी उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात आले. 1.8 किलोमीटर लांबीच्या या उड्डाण पुलावर सहा मार्गिका आहेत. या पुलाचे सेंट स्टिफन हॉस्पिटल, 30 हजारी कोर्ट, फिल्मस्तान सिनेमा आणि त्याला जोडूनच असलेल्या बर्फ खाना, डीसीएम चौक, आझाद मार्केट, सब्जी मंडी या दिल्लीतल्या विविध भागाकडे रस्ते जात आहेत.
या पुलाचा शिलान्यास जवळपास दशकापूर्वी झाला होता. मात्र काम बरीच वर्षे रखडले होते. पुलाचे जवळपास 43 टक्के काम गेल्या वर्षभरात पूर्ण झाले आहे, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी दिली. या पुलाचा लाभ रोज जवळपास 5 लाख वाहतूकदारांना होणार आहे, त्याचबरोबर या परिसराला वाहतुकीच्या कोंडीची समस्या कमी होणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/P.Kor
(Release ID: 1549852)
Visitor Counter : 68