पंतप्रधान कार्यालय

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 11 OCT 2018 6:16PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली11 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. मानवी आयुष्याचे वर्तमान आणि भूतकाळ बदलण्याची क्षमता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहेअसे ते म्हणाले. सॅनफ्रान्सिस्कोटोकियो आणि बिजिंग नंतर जगातले हे चौथे केंद्र असून यामुळे भविष्यातील अफाट संधींसाठी दारे खुली होतीअसे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धीमत्तायंत्रांचा अभ्यासइंटरनेटब्लॉकचेन आणि बिग डेटा यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात भारत विकासाची नवी शिखरे पार करेल आणि येथील नागरिकांचे जीवनमान सुधारेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतासाठी हे केवळ औद्योगिक परिवर्तन नव्हे तर सामाजिक परिवर्तन आहेअसे ते म्हणाले. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये देशात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहेअसे सांगत देशात होत असलेल्या कामाला यामुळे गती मिळेल तसेच व्याप्ती वाढेल असे ते म्हणाले.

डिजिटल भारत चळवळीमुळे देशातल्या गावांपर्यंत इंटरनेट सेवामोबाईलइंटरनेट यांसारख्या सुविधा कशा प्रकारे पोहोचल्या याचा उल्लेख त्यांनी केला. भारतातील सामायिक सेवा केंद्रात वेगाने होत असलेल्या वाढीबद्दल त्यांनी माहिती दिली. जगात भारतामध्ये मोबाईल डेटाचा सर्वाधिक वापर होतो आणि भारतात कमी दरात ही सेवा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात त्यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत व्यवस्था आणि आधारयूपीआयई-नाम आणि जीईएम यांचा उल्लेख केला. कृत्रिम बुद्धीमत्तेतील संशोधनासाठी काही महिन्यांपूर्वी मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राष्ट्रीय रणनिती ठरवण्यात आली होती. या नवीन केंद्रांमुळे या प्रक्रिया बळ मिळेलअसे ते म्हणाले. चौथी औद्योगिक क्रांती आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा विस्तार यामुळे उत्तम आरोग्य सेवा कमी खर्चात उपलब्ध होईलअसे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनाही मदत मिळेल आणि कृषी क्षेत्रासाठी ती सहाय्यभूत ठरेलअसे ते म्हणाले. परिवहन आणि स्मार्ट मोबीलिटी यांसह अन्य क्षेत्र ज्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाऊ शकतेत्याचा त्यांनी उल्लेख केला. भारतात जेव्हा या क्षेत्रांमध्ये काम सुरू होईल तेव्हा ‘सॉल्व्ह फॉर इंडियासॉल्व्ह फॉर द वर्ल्ड’ हे एक उद्दिष्ट असेल.

चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ भारत उठवू शकेलअसा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. यामध्ये भारत भरीव योगदान देईलअसे ते म्हणाले. कौशल्य भारत अभियान,स्टार्टअप भारत आणि अटल नवोन्मेष अभियान यांसह सरकारी उपक्रम आपल्या युवकांना नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज करत आहेतअसे ते म्हणाले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1549528)
Read this release in: English