पंतप्रधान कार्यालय
हरियाणामध्ये सर छोटूराम यांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
सोनपत येथे रेल्वे कोच कारखान्याच्या पुनर्विकासाची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2018 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा येथील रोहतक येथील सांपला गावाला भेट दिली. त्यावेळी दीनबंधू सर छोटूराम यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांनी केले. पंतप्रधानांनी रेल्वे कोच कारखान्याच्या पुनर्विकासाची कोनशिला सोनपत येथे ठेवली. एकदा का हे काम पूर्ण झाले की, उत्तर विभागातील रेल्वे कोच कारखान्याला दुरुस्ती आणि राखरखाव सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. हा कारखाना पुनर्बांधणी तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री आणि मैत्रीपूर्ण पर्यावरण या आधारावर स्थापन होणार आहे.
याप्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, चौधरी छोटूरामजी हे एक समाजसुधारक होते. त्यांनी भारताच्या विकासामध्ये महत्त्वाचा सहभाग दिला. वंचित आणि अत्याचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला. पंतप्रधानांनी सांगितले की, रेल कोच पुनर्विकास कारखाना हा केवळ सोनपतच्या विकासामध्ये भागीदारी न होता संपूर्ण हरियाणा राज्याच्या विकासात सहभाग देईल. या विभागातील छोट्या उद्योजकांसाठी हा कारखाना लाभदायक ठरणार असून त्यामुळे तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होतील.
पंतप्रधानांनी सर छोटूराम यांच्या दृष्टीकोनातून भारताचे विश्लेषण केले. त्यांनी भाक्रा धरणासंदर्भामध्ये माहिती सांगितली. शेतकऱ्यांना योग्य त्या किंमतीची तरतूद देण्यामध्ये सर छोटूराम यांचे विशेष योगदान असल्याचे आणि हे योगदान लक्षात घेऊन केंद्र सरकारने घेतलेली भूमिका पंतप्रधानांनी विशद केली.
आयुष्मान भारत योजनेच्या विकासाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हरियाणा हे राज्य आयुष्मान भारत आरोग्य योजनेचा पहिला लाभकारी देणारे राज्य आहे. त्यांनी केवळ दोन आठवड्यामध्ये 50 हजार लोकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अंतर्गत मिळालेल्या यशस्वीतेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. जागतिक पातळीवर राष्ट्राला अभिमान वाटावा, अशी कामगिरी हरियाणामध्ये जन्मलेल्या मुलींनी क्रीडा विभागात केली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. छोटूराम यांच्या कल्पनेतील भारत साकार करण्यात आम्ही प्रयत्नशील असून वेगाने उद्दिष्ट साध्य करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1549140)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English