भारतीय निवडणूक आयोग

लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 151 ए नुसार हंगामी रिक्त जागा भरण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाला अधिकार

Posted On: 09 OCT 2018 4:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  9 ऑक्टोबर 2018

 

कर्नाटकमधून लोकसभेच्या तीन हंगामी रिक्त जागा भरण्यासाठी पोट निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या 5 रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुकीची घोषणा केलेली नाही, असे काही वृत्तपत्रांनी म्हटले आहे.

यासंदर्भात कर्नाटकमधील बेल्लरी, शिमोगा आणि मंड्या संसदीय मतदार संघातील जागा 18 आणि 21 मे रोजी रिक्त झाल्या तर आंध्र प्रदेशातील 5 संसदीय मतदार संघातील जागा 20 जून 2018 रोजी रिक्त झाल्या.

लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 151ए अन्वये निवडणूक आयोगाला जागा रिक्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणुकीद्वारे लोकसभा आणि विधीमंडळाच्या रिक्त जागा भरण्याचे अधिकार आहेत. मात्र, यासाठी लोकसभेचा एक वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ शिल्लक असायला हवा.

16 व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019 पर्यंत आहे. कर्नाटकमधील रिक्त जागा या लोकसभेच्या उरलेल्या कालावधीच्या एका वर्षापूर्वी रिक्त झाल्या असल्यामुळे तिथे पोटनिवडणूका 6 महिन्याच्या आत घेणे गरजेचे आहे. मात्र, आंध्र प्रदेशमधील रिक्त जागांसंदर्भात लोकसभेचा उर्वरित कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्यामुळे तिथे पोटनिवडणुका घेण्याची गरज नाही.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1549046) Visitor Counter : 694


Read this release in: English