रेल्वे मंत्रालय

स्वच्छ भारत अभियानांतर्गत, प्रभावी बदल घडवण्यासाठी रेल्वेच्या कार्यक्रमांची सुरुवात

Posted On: 05 OCT 2018 2:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2018

 

स्वच्छता अभियानाला पर्यावरणविषयक प्राधान्याची जोड देत, भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकं, जनतेची मोठी वर्दळ असणारी कार्यालये, रेल्वे वसाहती आणि कार्यालयात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत, रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानात कौतुकास्पद सहभाग नोंदवला तसेच 1300 किलोमीटरचा रेल्वे मार्ग, स्थानक परिसर आणि मोकळ्या जागांवर 13.27 लाख रोपांची लागवड केली.

रेल्वे इमारतींमध्ये स्वच्छताविषयक सुधारणा घडवण्यासाठी रेल्वेने सध्याच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती, नवी स्वच्छतागृहे बांधणे यासाठी 300 कोटी रुपये निर्धारित केले आहेत. रेल्वेने 1400 स्थानकांवर 1800 स्वच्छतागृहांची दुरुस्ती तसेच निर्मिती केली आहे. यामध्ये दिव्यांगांना वापरण्यासाठी सुलभ अशी 200 स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1548712)
Read this release in: English