आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
नेपा लिमिटेडच्या पुनरुज्जीवन, विकास आराखडा, प्रलंबित वेतनासाठी आणि कंपनीच्या निर्गुंतवणुकीकरिता आर्थिक सहाय्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2018 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीच्या बैठकीत, नेपा लिमिटेडला पुनरुज्जीवन आणि विकास आराखड्यासाठी 469.41 कोटी रुपयांच्या वित्तीय पॅकेजला मंजुरी देण्यात आली. नेपा लिमिटेड ही मध्य प्रदेशातल्या नेपा नगर इथे असलेली सार्वजनिक क्षेत्रातली न्यूजप्रिंट कंपनी आहे.
याद्वारे 277 कोटी रुपयांचे भांडवल घालण्यात येणार आहे त्यामुळे उत्पादन क्षमता वार्षिक 100000 मेट्रिक टनांनी वाढणार आहे. याशिवाय उत्पादन वैविध्य,उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठीही मदत होणार आहे. हा पुनरुज्जीवन आणि विकास आराखडा वर्षभरात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1548456)
आगंतुक पटल : 108
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English