संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल अमित देव यांनी वायुदलाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2018 10:03AM by PIB Mumbai
एअर मार्शल अमित देव व्हीएसएम,यांनी आज महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी डिसेंबर १९८१ मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून पदवी प्राप्त केली आणि 29 डिसेंबर 1982 रोजी भारतीय वायुदलाच्या फ्लाइंग ब्रांचमध्ये त्यांची नियुक्ती झाली.
वायु दलातल्या त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी विविध प्रकारची लष्करी व प्रशिक्षक विमान चालवली आहेत आणि जवळजवळ 2500 तास उड्डाण करण्याचा त्यांना अनुभव आहे. ते स्ट्रॅटेजिक आणि एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, कॉलेज ऑफ एयर वारफेयर आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
त्याच्या 36 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेमध्ये त्यांनी वायु दलाच्या मुख्यालयात संयुक्त संचालक पदासह अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
2010 मध्ये त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते.
****
B.Gokhale/ R. Aghor
(रिलीज़ आईडी: 1548258)
आगंतुक पटल : 99
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English