पंतप्रधान कार्यालय
सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र : २०१६ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी यांच्यातर्फे पंतप्रधांनाना सादरीकरण
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2018 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2018
भारतीय प्रशासन सेवेच्या २०१६ च्या तुकडीच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी, आज सहायक सचिव या सत्राच्या समारोपाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सादरीकरण केले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न, माती आरोग्य कार्ड, तक्रार निवारण, नागरिक-केंद्रित सेवा, ऊर्जा क्षेत्र सुधारणा, पर्यटक सुविधा, ई-लिलाव आणि स्मार्ट शहरी विकास उपाय यासारख्या आठ निवडक विषयांवर पंतप्रधानांना सादरीकरण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, सहाय्यक सचिवांच्या कार्यक्रमाद्वारे कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकार्यांना परस्परांशी संवाद साधण्याची संधी मिळते. पंतप्रधानांनी तरुण अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध मंत्रालयांशी संलग्न असताना त्यांनी घेतलेल्या कामाच्या अनुभवातून उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी तरुण अधिकाऱ्यांना लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करण्यास प्रोत्साहन दिले.
अवती भोवतीच्या लोकांशी संबंध विकसित करून त्यांच्यासह सेवा राष्ट्राला अर्पण करा. लोकांशी संबंध विकसित करणे हि अधिकाऱ्यांच्या कार्यातील आणि उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी यशस्वितेची किल्ली आहे. असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी तरुण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले.
B.Gokhale/ P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1547799)
आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English