सांस्कृतिक मंत्रालय
ग्वाल्हेरच्या राजमाता विजया राजे सिंदीया यांची जन्मशताब्दी सरकार साजरी करणार
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2018 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2018
ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे सिंदिया यांची जन्मशताब्दी येत्या 11 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2019 या काळात साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालची 12 सदस्यीय राष्ट्रीय अंमलबजावणी समिती, वर्षभर सुरु राहणाऱ्या या शताब्दी कार्यक्रमाची आखणी करणार आहे.विजया राजे यांच्या गौरवार्थ 100 रुपयाचे नाणे आणि टपाल तिकीट काढण्याचा सरकारचा विचार आहे. चर्चासत्रं, व्याख्यानं तसेच महिला सबलीकरणासाठीचे कार्यक्रम या वर्षभरात आखण्यात येणार आहेत.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1547652)
आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English