पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

ऑगस्ट महिन्यातील पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन

Posted On: 24 SEP 2018 1:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2018

 

ऑगस्ट महिन्यात देशात कच्च्या तेलाचे उत्पादन 2908.12 टीएमटी इतके झाले. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या उत्पादनाच्या तुलनेत ते 3.70 टक्के कमी आहे. तर उद्दिष्टापेक्षा 6.47 टक्के कमी आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत कच्च्या तेलाचे एकूण उत्पादन 14611.53 टीएमटी इतके होते. हेही उद्दिष्टापेक्षा 3.55 टक्के कमी आहे. ओएनजीसीसह सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व कंपन्यांचे ऑगस्ट महिन्यातील कच्च्या तेलाचे उत्पादन कमी झाले आहे.

ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक वायूचे उत्खनन उद्दिष्टापेक्षा 8.10 टक्क्यांनी कमी झाले आहे. या महिन्यात हे उत्पादन 2789.34 एमएमएससीएम इतके झाले. तर एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत ते 13,571.58 एमएमएससीएम इतके होते.

कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाच्या क्षेत्रात मात्र ऑगस्ट महिन्यात तुलनेने चांगली कामगिरी आहे. त्या महिन्यात शुद्ध तेलाचे उत्पादन 21437.85 टीएमटी इतके झाले. जे उद्दिष्टापेक्षा 3.11 टक्के जास्त आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत शुद्ध तेलाचे उत्पादन 117806.48 टीएमटी इतके असून ते उद्दिष्टापेक्षा 2.8 टक्के अधिक आहे.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1547039) Visitor Counter : 174


Read this release in: English