मंत्रिमंडळ

जम्मू काश्मीर मधल्या दुर्बल घटकातल्या ग्रामीण कुटुंबाना प्रोत्साहन

Posted On: 19 SEP 2018 3:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 सप्टेंबर 2018

 

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी जम्मू-काश्मीर मधे 2018-19 मधे आणखी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत   झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला.

 जम्मू काश्मीरसाठी या योजने अंतर्गत विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी दारिद्रय रेषेशी न जोडता गरजेनुसार निधी मंजूर करण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे कोणताही अतिरिक्त वित्तीय बोजा पडणार नाही. 2018-19 या वर्षासाठी 143.604 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

प्रभाव :-

यामुळे राज्यातल्या सर्व  दुर्बल घटकातल्या ग्रामीण कुटुंबाना म्हणजे सुमारे दोन तृतीयांश कुटुंबाना विहित कालावधीत या अंतर्गत आणता येणार आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत जम्मू काश्मीरमधल्या सर्व विभागाचा समावेश होऊन सामाजिक समावेशकता,उपजीविकेसाठी प्रोत्साहन मिळून राज्यात दारिद्रय निर्मूलनाला मदत होणार आहे.

पूर्वपीठीका :-

काही अपरिहार्य कारणांमुळे आणि अशांत स्थितीमुळे राज्यात मे 2013 मधे मंजूर झालेले  विशेष पॅकेज पूर्णतः लागू करण्यात आले नव्हते.

 

N.Sapre/ N.Chitale/P.Malandkar



(Release ID: 1546675) Visitor Counter : 57


Read this release in: English