संरक्षण मंत्रालय

9,100 कोटी रुपयांच्या सामुग्रीच्या खरेदीला डीएसीची मंजुरी

Posted On: 18 SEP 2018 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  18 सप्टेंबर 2018

 

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची आज बैठक झाली. या बैठकीत संरक्षण दलासाठी 9,100 कोटी रुपयांच्या सामुग्रीच्या खरेदीवर मंजुरी देण्यात आली. स्वदेशी आणि स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट लक्षात घेऊन परिषदेने मे.बीडीएलकडून आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची दोन रेजिमेंट खरेदी करायला मंजुरी दिली. आधीच्या आकाश क्षेपणास्त्राचे हे सुधारित रुपांतर आहे.

टी 90 टँकसाठी आययुडब्ल्युबीएच्या रचना आणि विकासासाठी डीएसीने मंजुरी दिली. डीएसीने टी 90 टँकच्या गायडेड वेपन्स प्रणालीसाठी प्रायोगिक उपकरणांच्या विकासातही मंजुरी दिली. डीआरडीओ हे उपकरण विकसित करत आहे.

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1546497)
Read this release in: English