पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबरला ''स्वच्छता हि सेवा " अभियानाची सुरवात करणार

प्रविष्टि तिथि: 14 SEP 2018 4:50PM by PIB Mumbai

नवी  दिल्ली -सप्टेंबर १४२०१८

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५  सप्टेंबर २०१८ ला  ''स्वच्छता  हि  सेवा " अभियानाची  सुरवात  करणार आहेत

या पंधरवड्याच्या अभियानासाठी विस्तृत प्रक्षेपण कार्यक्रमाचा एक भाग म्हणूनपंतप्रधानव्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या  विविध 18 ठिकाणांच्या  लोकांशी  क्रॉस-सेक्शनसह संवाद साधतीलज्या लोकांबरोबर प्रधान मंत्री चर्चा करतील त्यात  शालेय मुलेजवानआध्यात्मिक नेतेदूध आणि कृषी सहकारी संस्थाप्रसारमाध्यमेस्थानिक सरकारी प्रतिनिधीरेल्वे कर्मचारीस्वयं सहाय्य समूहआणि स्वच्छतागृही  यांचा  सहभाग असेल.

दिनांक ऑक्टोबर,2018 रोजी स्वच्छ भारत मिशनच्या चौथ्या वर्धापन आणि महात्मा गांधी यांच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त "स्वच्छता हि सेवा " या   स्वच्छता मोहिमे ला अधिक व्यापक बनविण्यासाठी  आणि लोकांचा मोठ्या प्रमाणावर  सहभाग अपेक्षित आहेतसेच  महात्मा गांधी यांच्या १५० व्या वर्षाउत्सवाची पूर्ती निमित्त हे अभियानआयोजितकरण्यात आले आहेया  अभियानाचे  वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, " बापूंना  श्रद्धांजली  देण्याचा  एक  उत्तम  मार्गया शब्दात  केले असून त्यांनी  विडीओ  संदेशद्वारे , लोकांना  स्वच्छ  भारतासाठी च्या   प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी आव्हान केले आहे.

                                                                                                         ****   

B. Gokhale


(रिलीज़ आईडी: 1546178) आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Bengali , Bengali , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam