पंतप्रधान कार्यालय

‘स्वच्छता ही सेवा’ चळवळीचा प्रत्येकाने भाग व्हावे-पंतप्रधानांचा नारा

प्रविष्टि तिथि: 12 SEP 2018 3:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2018

 

‘स्वच्छता ही सेवा’ या चळवळीचा प्रत्येकाने भाग व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

‘2 ऑक्टोबर गांधीजींच्या 150 व्या जयंतीची सुरुवात. बापूंचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी याच दिवशी सुरू केलेल्या स्वच्छ भारत ऐतिहासिक लोकचळवळीला चार वर्ष पूर्ण होत आहेत.

स्वच्छ भारतासाठी काम करणाऱ्या सर्वांना सलाम!

‘स्वच्छता ही सेवा’ चळवळ 15 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. बापूंना आदरांजली वाहण्याचा उत्तम मार्ग आहे.

चला, या मोहिमेचा भाग होऊ या आणि स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न वृद्धींगत करूया!

15 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता आपण एकत्र येऊ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ चळवळीला सुरूवात करू. स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करण्यासाठी अविरत काम केलेल्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे.’

 

B.Gokhale/S.Kakde/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1545755) आगंतुक पटल : 106
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English