पंतप्रधान कार्यालय

यूएसआयबीसी मंडळाच्या सदस्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 07 SEP 2018 4:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2018

 

युनायटेड स्टेट इंडिया बिझनेस काऊंसिल-यूएसआयबीसी मंडळाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

मुंबईत या आठवड्यात झालेल्या इंडिया आयडिया फोरमच्या फलिताबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आराखडा आखण्याचा तसेच भारतातील सीएसआर संबंधित कामांचा विस्तार करण्याचा मानस, उद्योग क्षेत्रातील धुरिणांनी बोलून दाखविला.

या सदस्यांशी संवाद साधताना, केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध सुधारणांची माहिती पंतप्रधानांनी त्यांना दिली. भारतात असलेल्या गुंतवणूक संधींबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच भारतात अमेरिकन गुंतवणूक समुदायाने गुंतवणूक वाढवावी यासाठी प्रोत्साहन दिले. भारत आणि अमेरिका यांच्यातील समान मूल्यांचा उल्लेख करत दोन्ही देशातील नागरिकांमधील संवाद आणि देवाणघेवाण वाढावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor



(Release ID: 1545320) Visitor Counter : 93


Read this release in: English