राष्ट्रपती कार्यालय

भारताच्या राष्ट्रपतींनी घेतली बल्गेरियाच्या पंतप्रधानांची भेट, सोफिया येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे केले अनावरण

Posted On: 06 SEP 2018 5:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2018

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज बल्गेरियाचे पंतप्रधान बोटको बोरीसोव्ह यांची सोफिया येथे भेट घेतली. बोरीसोव्ह नेतृतवाखाली बल्गेरिया कौतुकास्पद प्रगती करत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

बल्गेरियासोबतच आर्थिक संबंध अधिक चांगल्या प्रकारे वृद्धींगत व्हावेत, असे भारताला वाटते. माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया अशा अनेक क्षेत्रांमध्ये बल्गेरिया चांगली प्रगती करत आहे. या क्षेत्रातील कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून बल्गेरियामध्ये गुंतवणूक करण्यास भारत उत्सुक असल्याचे राष्ट्रपतींनी पंतप्रधान बोरीसोव्ह यांना सांगितले.

या भेटीनंतर सोफियामध्ये साऊथ पार्क येथे उभारण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरणही राष्ट्रपतींनी केले. राष्ट्रीय एकीकरण दिनाचे औचित्य साधून या विशेष दिवशी बल्गेरियामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी बल्गेरियाच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor


(Release ID: 1545164) Visitor Counter : 180


Read this release in: English