नौवहन मंत्रालय

सागरमालाचे बनावट संकेतस्थळ

Posted On: 06 SEP 2018 2:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2018

 

सागरमालाच्या http://sagarmala.org.in/ या बनावट संकेतस्थळावरुन नोकरी मिळवण्यास इच्छुकांना आणि सागरमाला प्रकल्पाशी संबंधितांना ईमेल पाठवले जात असल्याचे नौवहन मंत्रालयाच्या निदर्शनाला आले आहे. सागरमालाच्या मूळ संकेतस्थळाशी मिळतेजुळते असे हे संकेतस्थळ असून त्यावरुन अभियंता आणि पदविकाधारक प्रशिक्षणार्थींच्या नियुक्तीसंदर्भातील खोटी जाहिरात प्रसारीत होत आहे.

अशा प्रकारच्या खोट्या आणि फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणांसंदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये शिक्षेची तरतूद आहे. सागरमाला प्रकल्पाशी संबंधितांच्या माहितीसाठी http://www.sagarmala.gov.in/ हे सागरमाला प्रकल्पाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, याची नोंद घेतली जावी.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor


(Release ID: 1545126) Visitor Counter : 120
Read this release in: English