कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पश्चिम विभागात स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून होणाऱ्या भर्तीसंदर्भात शॉर्ट नोटीस
Posted On:
31 AUG 2018 4:34PM by PIB Mumbai
मुंबई, 31 ऑगस्ट 2018
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्र सरकारच्या खात्यातल्या देशभरात विविध पदांच्या भर्तीसाठी 5.09.2018 ला नोटीस जारी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत 30.09.2018 राहील. www.sscwr.net या संकेतस्थळावर आणि 5.09.2018 च्या एम्पॉलयमेंट न्यूजमध्ये भर्तीसाठीची सूचना उपलब्ध राहील.
स्टाफ सिलेक्शन कमिशन पश्चिम विभाग मुंबईच्या कार्य कक्षेत येणाऱ्या गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या पदांचा या जाहिरातीत समावेश राहील.
पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना यासाठी अर्जदाराने पश्चिम विभागीय कार्यालयाच्या www.sscwr.net या संकेतस्थळाला भेट देऊन या नोटीसबाबतची तपशीलवार माहिती घ्यावी.
पात्र उमेदवारांनी http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर, दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज भरावेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे भरलेले अर्ज स्वीकारार्ह नाहीत.
N.Sapre/ N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1544654)
अभ्यागत कक्ष : 108