नौवहन मंत्रालय
बंदरे आणि गोदी कामगारांसाठी नव्या वेतन करारावर स्वाक्षऱ्या
1,35,000 कामगारांना होणार लाभ
बंदर कामगारांच्या लाभासाठी महत्वाची बंदरे 560 कोटी रुपये खर्च करणार
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2018 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2018
“क” आणि “ड” श्रेणीच्या बंदरे आणि गोदी कामगारांच्या नव्या वेतनाविषयीच्या करारावर आज मुंबईत केंद्रीय जहाज बांधणी, रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या नव्या करारानुसार कामगारांना पगारात 10.6 टक्के वाढ आणि महागाई भत्ता मिळणार आहे. कामगारांची किमान वेतन पातळी 20,900 ते 43,600 इतकी राहील तर कमाल वेतन 36,500 ते 88,700 एवढे असेल.
या निर्णयाचा लाभ 32,000 बंदर आणि गोदी कामगार तसेच 1,05,000 निवृत्ती धारकांना होईल. देशभरातल्या सर्व महत्वाच्या बंदरांवरील कामगारांना या निर्णयाचा लाभ मिळेल. या वेतनवाढीसाठी 560 कोटी रुपयांचा वार्षिक निधी लागणार आहे.

या कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या “सर्वांचे कल्याण” या उद्दिष्टाला या निर्णयामुळे बळ मिळणार असून देशभरातली महत्वाची बंदरे या सामाजिक, आर्थिक बदलासाठी पुढे आलीत याचा मला विशेष आनंद आहे. या बंदरांनी नव्या वेतन करारावर स्वाक्षऱ्या करुन चांगला पायंडा पाडला आहे.
यावेळी बंदरे आणि गोदी कामगार संघटना आणि बंदर व्यवस्थापन यांच्यात प्रादेशिक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. नवा वेतन आयोग 1 जानेवारी 2017 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार आहे. हा पाच वर्षांचा करार असेल.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1544562)
आगंतुक पटल : 117
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English