पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधानांच्या क्रीडाप्रेमींना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
29 AUG 2018 12:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"सर्व क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंदजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन. यानिमित्त माझी सर्व जनतेला आग्रही विनंती आहे की त्यांनी क्रीडा आणि सुदृढ आरोग्याशी संबंधित व्यायामावर भर द्यावा. यामुळे आपल्याला निरोगी भारताची निर्मिती करता येणार आहे.
विविध क्रीडा प्रकारात ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले, अशा सर्व खेळाडूंना माझे नमन! त्यांचे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयामुळेच आपण क्रीडा क्षेत्रात मैलाचे टप्पे पार केले आहेत. हे वर्ष भारतीय क्रीडा विश्वासाठी अत्यंत महत्वाचे ठरले आहे. भारतीय ऍथलिटसनी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1544209)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English