शिक्षण मंत्रालय

केरळच्या पूरग्रस्त शाळा आणि विद्यार्थ्यांना सीबीएससीची मदत

Posted On: 28 AUG 2018 4:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  28 ऑगस्ट 2018

 

केरळमध्ये भीषण पुरात शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सीबीएससी म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मदत करणार आहे. या पुरामुळे विद्यार्थ्यांच्या शालांत प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, स्थलांतरण प्रमाणपत्र अशी कागदपत्रे नष्ट अथवा खराब झाली असल्यास या विद्यार्थ्यांना सीबीएससीकडून नव्या डिजिटल स्वरुपातील कागदपत्रे दिली जाणार आहेत. केरळमध्ये सीबीएससीच्या 1300 शाळा आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी ही प्रमाणपत्रे अनिवार्य असतात, हे लक्षात घेऊन सीबीएससीने पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात कागदपत्रे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. डिजी लॉकर/परिणाम मंजुषा अंतर्गत प्रमाणपत्रे दिली जातील.

ही कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिणाम मंजुषाच्या https://cbse.digitallocker.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून मिळवता येतील. ज्या विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर मंडळाकडे नोंदला गेला नाही किंवा 2004 ते 2015 या कालावधीतल्या विद्यार्थ्यांना आधार क्रमांकाच्या मदतीने ही कागदपत्रे पुन्हा मिळवता येतील. आधारक्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी परिणाम मंजुषाच्या support@digitallocker.gov.in या ईमेलवर संपर्क करावा.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1544135) अभ्यागत कक्ष : 79
Read this releasein: English