पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमधे सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2018 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2018
इंडोनेशियात, जकाते-पालेमबंग इथे सुरु असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वर्णसिंग, दत्तु भोकनळ, ओम प्रकाश, सुखमित सिंग यांच्या संघाने रोईंगमधे पुरुष क्वाड्रापल स्कल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघाचे अभिनंदन केले आहे.
पुरुषांच्या संघाने क्वाड्रापल स्कल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून भारताला अभिमानास्पद कामगिरी केली आहे. स्वर्णसिंग, दत्तू भोकनळ, ओम प्रकाश आणि सुखमित सिंग यांच्या संघांचे अभिनंदन असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
N. Sapre/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1543967)
आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English