पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 23 ऑगस्टला गुजरात दौऱ्यावर

Posted On: 22 AUG 2018 6:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला गुजरातला भेट देणार आहेत.

सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने आखलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)च्या लाभार्थींचा वलसाड जिल्ह्यातल्या जुजवा गावात पंतप्रधानांच्या उपस्थितीत सामूहिक ई गृहप्रवेश होणार आहे.

गुजरातमध्ये एक लाखापेक्षा जास्त घरे पूर्ण झाली आहेत. 26 जिल्ह्यातले लाभार्थी सामूहिक गृहप्रवेश करणार आहेत. वलसाड येथे दक्षिण गुजरातमधल्या वलसाड, नवसारी, तापी, सुरत आणि डांग या पाच जिल्ह्यातले लाभार्थी एकत्र येणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांसाठी गट स्तरावर सामूहिक गृहप्रवेश होणार आहे. या जिल्ह्यातले लाभार्थी, व्हिडिओ लिंकद्वारे, वलसाड येथील मुख्य कार्यक्रमाशी जोडले जाणार आहेत. दोन लाख लोक या कार्यक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

याच कार्यक्रमात दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामोदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण चरितार्थ अभियान यासह विविध विकास योजनांच्या निवडक लाभार्थींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रोजगार विषयक पत्र सुपूर्द करतील.

महिला बँक सहाय्यकांना मिनी एटीएम आणि नियुक्तीपत्राचे वितरण करतील. उपस्थितांना पंतप्रधान संबोधितही करतील.

जुनागढ येथे पंतप्रधान विविध विकास योजनांचे उद्‌घाटन करतील. जुनागढ सरकारी रुग्णालय, जुनागड महापालिकेचे 13 प्रकल्प, खोखराडा येथे दुग्ध विकास प्रकल्प यांचा यात समावेश आहे. एका सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. गांधीनगर येथील गुजरात न्यायवैद्यक विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही पंतप्रधान मार्गदर्शन करतील. दिल्लीला परतण्यापूर्वी पंतप्रधान गांधीनगर येथे सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीलाही उपस्थित राहतील.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1543667) Visitor Counter : 89


Read this release in: English