गृह मंत्रालय

स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस पदकांची घोषणा

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2018 4:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  14 ऑगस्ट 2018

 

यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त 942 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. 2 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक (पीपीएमजी), 177 कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदके, 88 कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 675 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

महाराष्ट्रातील 8 कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदक, 3 कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 40 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

पदक विजेत्यांची यादी www.mha.nic.in आणि pib.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1542974) आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English